भगवान गणेश यांनी कुबेरांस दिलेली शिकवण, ती आपल्या सर्वांसाठीच एक शिकवण आहे
येथे कुबेराचा बाग उगवावा, / जे उत्तरेकडील कुरूंपासून दूर आहे; / याच्या पानांना कपड्यांची आणि रत्नांची जडणे द्या / आणि त्याची फळे दैवी असतील. "- रामायण
कोणे एके काळी, धन व संपत्तीचा स्वामी असणारा कुबेर, आत्यंतिक गर्व आणि अहंकाराने ग्रासला गेला. आपली संपत्ती सर्व देवांना दिसावी, त्यांनी तिचे कौतुक करावे, असे त्याला वाटले.
असे म्हणतात की आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मेजवानी आयोजित करणे. त्याने राजवाड्यात एक मोठा समारंभ आयोजित करण्याचे योजिले आणि अतिथींना विविध प्रकारचे भोजन देण्याचे ठरविले. कुबेरांनी अनेक देवता आणि अतिथींना आमंत्रित केले.
तथापि, त्याने विचार केला की देवाधिदेव भगवान शिव आणि देवी पार्वती आले नाहीत, तर संपूर्ण समारंभ व्यर्थ ठरेल. म्हणून, कुबेर शिव आणि पार्वतीला आमंत्रण देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी कैलासा येथे गेला.
दुसरीकडे भगवान शिव यांना कुबेरच्या मनात काय चालले आहे, हे कळले होते आणि त्यांनी कुबेराला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लगेचच लक्षात आले की कुबेर त्यांना प्रेम किंवा भक्तीभावाने आमंत्रण देण्यासाठी आले नाहीत, तर स्वत:च्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी बोलावत आहेत. कुबेराचा हेतू जाणून घेत भगवान शिव यांनी अतिशय नम्रपणे मेजवानीस येण्यास नकार दिला आणि म्हणाले, "प्रिय कुबेरा, मी मेजवानीला येऊ शकत नाही, परंतु माझा धाकटा मुलगा गणेश तुमच्या निमंत्रणाला मान देईल. फक्त त्याला प्रचंड भूक लागते; मी आशा करतो की तुम्ही त्याला संतुष्ट कराल."
आपल्याच संपत्तीच्या गर्वाने अंध झालेल्या कुबेराला गणेशास जेवायला घालण्यास काहीच वावगे वाटले नाही. तो आपल्या राजवाड्यात परत गेला आणि मेजवानीची तयारी करू लागला.
ठरलेल्या दिवशी, गणेशासह सर्व अतिथीदेखील आले. देवांसोबत गणेशांचे आगमन झालेले पाहून भगवान कुबेर आनंदित झाले. त्याने त्वरित गणेशास विविध प्रकारची नवनवीन आणि स्वादिष्ट पदार्थ वाढले. गणेश, ज्यांना लंबोदर म्हणजे "मोठे पोट", असेही संबोधतात, ताबडतोब जेवावयास बसले, आणि वाढलेले पदार्थ पटापट खाण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य!, थोड्याच वेळात सर्व अन्न संपले. बाल गणेशाला आणखी अन्न वाढण्यात आले पण गणेशाने इतर देवांसाठी बनविलेले अन्न सुद्धा खाऊन टाकले. गोंधळलेल्या आणि लाजिरवाण्या झालेल्या, कुबेरांनी इतर ठिकाणांहून अन्नाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला, परंतु भुकेलेले गणेश वाट पाहण्यास अजिबात तयार नव्हते. त्यांनी अगदी भांडी, वस्तू व महाल असे जे हाती येईल ते खायला सुरुवात केली. भयभीत कुबेराने गणेशाला शांत होण्याची विनवणी केली, पण गणेशने त्याला धमकावले की, "जर तू मला अन्न दिले नाहीस तर मी तुलाच खाउन टाकेन."
गोंधळलेल्या कुबेराला स्वत:ची चूक लक्षात आली आणि मदत मागण्यासाठी थेट भगवान शिव यांच्याकडे गेले. स्वत:च्या गर्वाबद्दल त्यांची क्षमा मागितली. त्याच्या सुटकेसाठी, भगवान शिव यांनी त्याला एक मूठभर भाजलेले तांदूळ दिले, जे प्रेम आणि विनयशीलतेने ओतप्रोत होते आणि ज्यामुळे शेवटी छोट्या गणेशची भूक भागली.
आणि अशाप्रकारे ही छोटी गोष्ट संपते.
कुबेर आणि गणेशाची ही मनोरंजक कथा अनेक छोट्या छोट्या लाइफ लेश्न्स आहे. बाप्पानी कुबेराला दिलेल्या धड्यातून आपण काय शिकू शकतो ते पाहूयात.
आपल्या संपत्तीचा गर्व करू नका
बरेच लोक स्वत: न कमाविलेले पैसे, त्यांना न आवडणाऱ्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी, स्वत:ला नको असलेल्या वस्तू विकत घेण्यात खर्च करतात. - विल स्मिथ
विचित्रच आहे? नाही का? पैसा ही गर्व करण्याची वस्तू नाही, तर तिचे नीट व्यवस्थापन करण्याची गोष्ट आहे. शहाणपणाने व्यवस्थापन न केल्यास अगदी कुबेराचे खजिनाही रिकामा होऊ शकतो. होणाऱ्या वित्तीय नुकसानीपासून स्वत:ला वाचवण्यासाठी, योग्य गुंतवणूक योजना आखणे शहाणपणाचे आहे. विशिष्ठ उद्देश न ठेवता केलेल्या नुकसानीचा संकटकाळात फारसा फायदा होत नाही. शिक्षण, सेवानिवृत्ती, आरोग्यसेवा, आणीबाणी इत्यादी सारख्या कोणत्या गोष्टीसाठी पैसे लागू शकतात, याचे अचूक उद्दिष्ट ठेवा. याने तुम्हाला भविष्यात येणा-या फाइनेंशियल अडचणी सोडविण्यासाठी आपल्याला खरोखर किती पैसे वाचवावे लागतील, हे ठरविण्यात मदत होईल.
आणीबाणीसाठी बचत करा
अवांछित आणीबाणी अनेकदा न बोलावता येतात. परंतु जर आपण आर्थिकदृष्ट्या तयार नसू तर मात्र हे म्हणजे संकटाना स्वत:हून आमंत्रन देण्यासारखे आहे; जसे की कुबेर, ज्याने पुरेसे नियोजन न करता भगवान गणेश यांना आमंत्रण दिले! मासिक उत्पन्न योजनांपासून योग्य विमा योजनेपर्यंत, शक्य त्या प्रत्येक आर्थिक शस्त्राने स्वत: ला सुरक्षित करा. तुम्हाला याची कल्पनाही नसेल की, की दहा वर्षांपूर्वी घेतलेली विमा योजना तुमच्या पाल्याचे स्वप्न पूर्ण करेल. खरे तर, तुम्हाला पहिल्या पगाराचा चेक मिळाल्यानंतर लगेचच बचत करण्यास सुरूवात केली पाहिजे. अन्यथा, पैसे कसे वाचवायचे हा यक्ष प्रश्न तुम्हाला आयुष्यभर सतावित राहील.
फक्त बचत करू नका परंतु गुंतवणूक करा
तुमच्या बँक खात्यामध्ये किती रक्कम पडून आहे, हे महत्त्वाचे नाही, ती कशी वाढवायची याचा मार्ग सापडेपर्यंत ती संपून देखील जाईल. आपल्याकडे काही कुबेरासारखे खजिनाचे साठे नाहीत, म्हणून आपल्याला ते चातुर्याने करावे लागेल. तुम्हाला फक्त एका योग्य गुंतवणूकीचे आर्थिक सहाय्य आवश्यक आहे. एसआयपी पासून विमा योजनांपर्यंत, तुमचे पैसे वाढवेल असा प्रत्येक पर्याय वापरा.
अशा प्रकारे गणेश आणि कुबेराची कथा आपल्याला जीवनातील मूलभूत तत्त्वांपैकी एक शिकवते, म्हणजे, आपल्या संपत्तीबद्दल अभिमान बाळगू नका; त्याऐवजी ती शहाणपणाने वापरा. जरी आपण श्रीमंत असाल तर नम्र राहा. नेहमी लक्षात ठेवा:
Leave a Reply
Add new comment